आरोग्यनामा ऑनलाईन- कमळाच्या फुलाचा वापर बहुतेक वेळा पूजेसाठी किंवा शोभेसाठी केला जातो. दरम्यान, कमळाच्या फुलातून काढलेल्या तेलाचा वापर सौंदर्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे. मुख्यतः हिवाळ्यात निर्जीव केस आणि कोरड्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अश्या परिस्थिती हे तेल त्वचा आणि केसांसाठी वरदान आहे. यात अँटी ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे केस सिल्की आणि सॉफ्ट होतात. सोबतच केसांची मुळे मजबूत होऊन वाढही चांगली होते. त्याचबरोबर केसांच्या गळतीबरोबर ते कोंड्याची समस्याही दूर होते. तयार कमळाचं तेल बाजारात अनेक ठिकाणी मिळते.
केसांसाठी वापर :
कमळाच्या तेलाचा वापर करण्यासाठी केस कंडिशनर करू शकता. केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनरप्रमाणे कमळाचं तेल लावा. यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या चमकदार होतील.
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी :
कमळाच्या तेलाचा वापर केसांप्रमाणेच त्वचेवरही करता येतो. कमळाच्या तेलाच्या नियमित वापराने त्वचेचा डलपणा कमी होतो. यामुळे आतून पोषण मिळते आणि त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
वापर :
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कमळाच्या तेलाचा फेसपॅकप्रमाणे वापर करता येतो. यासाठी कच्च्या दूधात थोडं कमळाचं तेल मिसळा आणि फेसमास्क तयार करा. हे तुमच्या चेहरा आणि मानेवर एकसमान लावा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवून टाका. फेसमास्क तयार करण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ आणि कमळाचे तेल एकत्र देखील वापरू शकता. यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ आणि एक चमचा कमळाचे तेल एकत्र करा. चेहरा आणि मानेवर हा मास्क लावा .अर्धा तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.