आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा ही समस्या अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. बदललेली जीवनशैली तसेच चूकीचा आहार यामुळे वजन वाढते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करताना अनेकजण दिसतात. काहीजण अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी औंषधाचा आधार घेतात तर काहीजण तासनतास व्यायाम करून शरिरातील घाम गाळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.
वाढलेले वजन कमी करण्याचा एक चांगला उपाय आहे तो म्हणजे ब्लड ग्रुपनुसार आहार घेणे. यामुळे वाढलेले वजन कमी होऊ शकते. ब्लड ग्रुप नुसार आहार घेण्याचे मुख्य कारण म्हणजे शरिरातील मॅटाबॉलिजम, म्हणजेच अन्न पचवण्याची प्रकिया आपल्या ब्लड ग्रुपवर अवलंबून असते. त्यामुळे वजन सहज कमी करता येते.
ब्लड ग्रुप ‘ओ’
या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींची पचनशक्ती उत्तम असते. त्यामुळे या व्यक्ती हायप्रोटीन डाएट सुद्धा पचवू शकतात. या व्यक्तींनी भरपूर प्रोटिनयुक्त अन्न पदार्थ म्हणजेच मांस, मच्छी खावी. फळे आणि भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ब्रोकली, पालक आणि रेड मीट यांचा आहारात सामावेश करावा. तसेच शरीराला आवश्यक व्यायाम केल्याने वजन कमी होऊ शकते. या व्यक्तींनी आटा, मैदा, पत्तागोबी, फूलकोबी, सरसो, डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन करू नये.
ब्लड ग्रुप ‘ए’
या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींची पचनक्रिया नेहमी खराब असते. त्यामुळे खाण्याआधी विचार करावा. बदाम, टोफू, फळे यांचा आहारात सामावेश करावा. रोज थोडासा व्यायाम करावा. मांस, मच्छी, चिकन आणि मिल्क प्रोडक्ट्स टाळावे.
ब्लड ग्रुप ‘बी’
या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींचा आहार ओ ब्लड ग्रुपशी अगदी मिळता जुळता आहे. या व्यक्तींनी गाय अथवा बकरीचे दूध प्यावे. मटन, हिरव्या भाज्या, मासे फायदेशीर आहेत. चिकनचे अधिक सेवन करू नये.
ब्लड ग्रुप ‘एबी’
या व्यक्ती कोणत्याही प्रकारचा आहार घेवू शकतात. ब्लड ग्रुप ए आणि बी, यासाठी असलेला आहार घेता येतो. मांस, सी फूड, डेअरी प्रोडक्ट्स, फळे, साग भाजी, टोफू हे पदार्थ या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत. मात्र, रेड मीट, बीन्सची भाजी, कॉर्नची भाजी सेवन करू नये.