वजन वाढत असेल तर प्या ‘या’ पद्धतीची कॉफी
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन वाढणे हे आता प्रत्येकासाठी एक समस्या बनत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. कधी जिमला जातो, तर कधी विविध औषधांचा वापर करतो. पण काहीही केले तरी वजन कमी होत नाही. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी कॉफी उत्तम औषध आहे. यासाठी जाणून घ्या अशा कॉफीबद्दल जी तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यात मदत करेल.
जेवणात आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. कॉफीतही खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून याचा सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजनही कमी होतो.
कॉफीमध्ये खोबरेल तेल मिसळून सेवन केल्याने फॅट लवकर बर्न होते. या कॉफीला बनवण्यासाठी तुम्हाला कॉफी मध्ये २ चमचे खोबरेल तेल मिसळायला पाहिजे. यामध्ये दूध न टाकताच या कॉफीचा सेवन केला पाहिजे. खोबरेल तेल कॉफी मध्ये मिसळताना कॉफी नेहमी गरम असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तेल आणि कॉफी एकमेकांत नीट मिक्स होऊ शकेल.
ब्लॅक कॉफीमध्ये रोज खोबरेल तेल मिसळून पिल्याने वजन कमी होण्यात मदत तर होतेच त्याच बरोबर शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. एवढेच नाही तर शरीरातील मेटाबॉलिज्म रेटही सुधारते.
Comments are closed.