आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ज्या व्यक्ती रात्री पूर्ण व व्यवस्थित झोपत नाहीत, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता इतर व्यक्तिंच्या तुलनेत अधिक असते. व्यवस्थित झोप न घेतल्याने शरीरामध्ये काही हार्मोन बदल होतात आणि त्यामुळे वजन वाढते, असे यूनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या फिजिकल अॅक्टिव्हीटी अॅन्ड वेट मॅनेजमेंट रिसर्च सेंटरच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होते. किंवा काही लोकांना असे वाटते की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढेच वजन कमी होते. पण हा समज चुकीचा आहे.
काय सांगतात संशोधक
1 जर एखादी व्यक्ती रात्री उशीरापर्यंत जागत असेल तर त्या काहीना काही खात राहतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.
2 ज्या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही, त्यांनाच जास्त भूक लागते. कारण जागे राहण्यासाठी शरीराला जास्त उर्जेची आवश्यकता असते.
3 लेप्टिन आणि ग्रेहलीन यांसारखे हार्मोन्स भूक लागण्यासाठी जबाबदार असतात. झोपेत असताना शरीरात हे हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्यास शरीराचे संपूर्ण चक्र बिघडते.
4 जेव्हा एखादी व्यक्ती झोपते त्यावेळी शरीरातील मांसपेशीं रिपेअर होत असतात. त्यामुळे पूर्ण झोप घेतली नाही तर मांसपेशी व्यवस्थित रिपेअर होत नाहीत.
5 कमी झोपल्याने मेटाबॉलिज्म कमी होते. शरीरातील कॅलरी बर्न होत नाहीत. परिणामी वजन वाढते.