१) जास्त पाणी पिणे. जास्त पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होत नाही तसेच भूक कमी लागते व मेटॉबॉलिजम उत्तमप्रकारे होते. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते आणि तुम्ही स्लिम दिसू लागतात.
२) च्युईंगम चघळणे. खरंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी लोक च्युईंगम खाणे पसंद करतात. या च्युईंगम आणखी एक उपयोग म्हणजे चेहऱ्यावरची चरबी कमी होणे. च्युईंगम खात असताना मांसपेशी आणि स्किनटोन सुधारतो चेहऱ्याचा आकार बदलतो थोडक्यात आकर्षक बनतो म्हणून रोज २० मिनिट च्युईंगम चघळले पाहिजे.
३) बदाममध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन बी ६ असते त्यामुळे त्वचा आतून टाईट आणि मॉइस्चराईझ होते. या व्हिटॅमिन्समुळे सॅच्युरेशन होत नाही म्हणून दररोज बदाम खाल्ले पाहिजेत.
४) चेहऱ्याच्या वेगवेगळ्या एक्सरसाईझ किंवा मुव्हमेन्ट करून चेहऱ्याचा टोन सुधारणे. यामुळे स्वेटिंग होते व साठलेली चरबी कमी होते. तुमचा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसतो.