आरोग्यनामा ऑनलाईन- अनेक लोक नियमित हेयर कलरचा(hair color) वापर करतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले आहेत. बाजारात विविध ब्रँडचे हेयर कलर उपलब्ध आहेत. परंतु, कोणताही हेयर कलर कितीही दावा केला तरी एकदा लावल्यानंतर महिनाभर सुद्धा टिकत नाही. यामुळे सतत हेयर कलर(hair color) लावावा लागतो. काहींना ते शक्य नसते. आज आम्ही तुम्हाला काही अशा हेयर टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा हेयर कलर अनेक दिवस टिकून राहू शकतो.
या टिप्स लक्षात ठेवा
1 एसएमएस शॅम्पूचा वापर
केसांना कोणताही शॅम्पू वापरल्यास तो तुमचा हेयर कलर कमजोर करतो. यासाठी ज्या शॅम्पूमध्ये सोडियम लॉरेल सल्फेटचा वापर केलेला असतो तो अजिबात वापररू नका. हे शॅम्पू एसएमएस युक्त असतात, ज्यामुळे केस धुताना खुप फेस होतो. अशा शॅम्पूमध्ये नैसर्गिक तेल खुप कमी असते. ज्यामुळे केस कमजोर होतात.
2 केस हवेत कोरडे करा
नेहमी लक्षा ठेवा केस हवेत सुखवा. कारण हेयर कलरच्या केसांना हीट, स्टायलिंग, हेयर ड्रायरचा वापर करू नये.
3 गरम पाण्याने धुवू नका
हेयर कलरचे कसे धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. कारण गरम पाण्यामुळे केंसाचे क्यूटिकल्स उघडून सूजतात. यामुळे हेयर कलरचा रंग कमी होतो. कोमट पाण्याचा वापर करा.
4 बाहेर जाताना केस करा कव्हर
घरातून बाहेर पडताना केस कपड्याने नेहमी झाकून घ्या. कारण कडक उन्हामुळे केसावर वापरलेला हेयर कलर डल होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.