आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिव्हर हा शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. लिव्हर हे रक्त शुध्द करते, यासोबतच अन्न पचन करण्यास मदत करते. या अवयवाला कोणत्याही प्रकारची ईजा झाली तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. लिव्हर हेल्दी ठेवण्याच्या काही टिप्स असून या उपायांनी लिव्हरच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
हा आहे उपाय
सकाळी नाष्टा करण्यापुर्वी एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक लहान चमचा लिंबूचा रस मिसळून प्यावे. या दरम्यान, सिगारेट, तंबाखू, दारु यांपासून दूर राहावे लागेल. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. नियमित एक्सरसाइज करा.
हा आहे फायदेशीर
ऑलिव्ह ऑइलमुळे गॉलब्लेंडर आणि लिव्हर योग्य प्रकारे काम करेल. लिंबूमुळे पचनक्रिया सुरळीत राहिल. जेवण योग्य प्रकारे पचन होईल.
लवकर दिसेल परिणाम
हे पेय प्यायल्याने लवकर परिणाम दिसेल. यामुळे स्किन उजळेल. डार्क सर्कल दूर होतील. तुम्ही नेहमी एनर्जेटिक राहाल.