आरोग्यनामा ऑनलाइन – बीग बी अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली होती. यावेळी रक्तदात्यांनी त्यांना ६० बॉटल्स रक्तदान केले होते. यातील एका रक्तदात्याच्या रक्तात हेपेटायटिस बी व्हायरस होता. या अपघातातून बचावलेल्या अमिताब यांना नंतर हेपेटायटिस बीचा सामना करावा लागला. नंतर त्यांनीच ही माहिती दिली. २०१५ मध्ये अमिताभ यांनी सांगितले की, ते फक्त २५ टक्के लिव्हरच्या आधारे जिवंत आहेत. हेपेटायटिस बी व्हायरसमुळे लिव्हरने ७५ टक्के काम करणे बंद केले आहे. हेपेटायटिस बी व्हायरससह लिव्हर खराब होण्याची अन्य कारणे सुद्धा आहेत, ती आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
जास्त मद्यपान
जास्त मद्यपान केल्याने लिव्हरमध्ये विषारी घटक जमा होतात. यामुळे लिव्हरचे नुकसान होते.
अपूर्ण झोप
झोप अपूर्ण होत असेल तर लिव्हरचे काम बिघडते. यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ लागते आणि ते खराब होते.
जास्त साखर खाणे
लिव्हर हे साखरेला फॅटमध्ये रूपांतरीत करण्याचे काम करते. जास्त साखर खाल्ल्यास लिव्हरवर कामाचा ताण येतो आणि जास्त फॅट लिव्हरमध्ये जमा होते. यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते.
जास्त पेनकिलर्स घेणे
जास्त प्रमाणात अथवा दिर्घकाळ पेनकिलर्स, पॅरासिटॅमॉल घेतल्यास लिव्हर खराब होऊ शकते.
कोल्ड्रिंक्सचे सेवन
जास्त प्रमाणात कोल्ड्रिंकचे सेवन केल्याने लिव्हर खराब होऊ शकते.
जंक फूड
जंक फूडमुळे शरीरातील पोषकतत्व कमी होतात. याचा परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हरमध्ये फॅट जमा होते. तसेच सिगारेट ओढणे, जास्त सल्पिमेंट घेणे, यामुळे सुद्धा लिव्हर खराब होऊ शकते.
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे