• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Liver Disease Causes Symptoms And Prevention | यकृताचे आजार वाढत आहेत, जाणून घ्या याची कारणं आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 18, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Liver Disease Causes Symptoms And Prevention | | liver disease causes symptoms and prevention News

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Liver Disease Causes Symptoms And Prevention | यकृत (Liver) हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. आपल्या रक्तातील रासायनिक पातळीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पित्ताचे उत्सर्जन आणि अन्नाचे पचन करण्याचे कार्य यकृताचे असते. याशिवाय शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून रक्त स्वच्छ ठेवण्यातही हा अवयव हातभार लावतो. गेल्या दशकात लिव्हरशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा (Liver Disease) धोका वाढताना दिसत आहे. राहणीमानातील बदल आणि खाण्याच्या सवयी यकृताच्या आरोग्यासही हानी पोहोचवतात. लिव्हरमधील छोट्याशा समस्येमुळे संपूर्ण शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो (Liver Disease Causes Symptoms And Prevention).

 

जनुकीय घटकांसह असंतुलित आहार हे यकृताच्या आजारांचे प्रमुख कारण मानले जाते. अल्कोहोलचे सेवन आणि लठ्ठपणा (Alcohol Consumption And Obesity) हे घटकदेखील यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. जर यकृताच्या या आजारांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर यकृत निकामी होऊ शकते. वेगाने वाढणार्‍या यकृताच्या आजारांची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठीच्या उपायांविषयी जाणून घेऊया (Liver Disease Causes Symptoms And Prevention).

 

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, अशुद्ध खाणे आणि अनुवांशिक घटकांमुळे या अवयवाशी संबंधित विविध आजार उद्भवतात. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला यकृताशी संबंधित गंभीर समस्या असतील तर तुम्हालाही त्या होण्याचा धोका असू शकतो. याशिवाय हिपॅटायटीसचा संसर्ग, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे, काउंटरवरील औषधे किंवा अल्कोहोलचे अतिसेवन, वजन जास्त (Hepatitis Infection, weak Immune System, Over Counter Drugs Or Alcohol Overdose, Overweight) असल्यामुळे यकृताच्या आजारांचा धोकाही वेगाने वाढत आहे.

आजाराची लक्षणे (Symptoms Of Liver Disease) :
यकृताच्या आजारांची लक्षणे वेळीच ओळखली तर गंभीर आणि जीवघेण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, यकृताच्या आजारात प्रत्येक वेळी चिन्हे दिसत नाहीत. काही बदल यकृताच्या आजाराची लक्षणे असू शकतात.

 

– वारंवार कावीळ होणे.

– अनेकदा पोटदुखी आणि सूज कायम राहते.

– लघवीच्या रंगात बदल

– थकवा आणि अशक्तपणाची समस्या.

– उलट्या किंवा मळमळण्याचा त्रास जाणवणे.

– भूक न लागणे किंवा पचन योग्य नसणे.

 

अल्कोहोल हानिकारक (Alcohol Harmful) :
यकृताचा आजार कोणालाही होऊ शकतो. उदाहरणार्थ, वजन जास्त असल्यास, जे लोक जास्त मद्यपान करतात, टाइप -२ मधुमेह किंवा जीवनशैलीच्या समस्येमुळे ग्रस्त असतात त्यांना यकृताच्या विकारांचा धोका जास्त आहे.

 

यकृताचे आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास प्राणघातक ठरू शकते.

यकृत निरोगी कसे ठेवावे (How To Keep Liver Healthy) ?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, यकृत रोगाचा उपचार आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार आहे आणि तो किती वाढला आहे यावर अवलंबून असतो. परिस्थितीनुसार औषधे आणि राहणीमानातील बदलांच्या आधारे हा आजार दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. जर समस्या खूप गंभीर असेल तर शस्त्रक्रिया आणि काही परिस्थितींमध्ये यकृत प्रत्यारोपणाची देखील आवश्यकता असू शकते.

 

यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ? (What To Do To Keep Liver Healthy) :
तज्ज्ञांच्या मते, यकृताच्या आजारांपासून बचावासाठी काही उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतात. विशेषत: संतुलित निरोगी आहार आणि राहणीमानातील बदल आपल्याला विविध प्रकारच्या रोगांच्या जोखमीपासून वाचवू शकते.

– अल्कोहोलमुळे यकृताचे सर्वाधिक नुकसान होते, ते टाळा.

– ट्रान्स फॅट्स किंवा उच्च फ्रुक्टोज असलेले पदार्थ आणि पेये टाळा.

– ओव्हर-द-काउंटर औषधांचे सेवन कमी करा. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच घ्या.

– नियमित व्यायाम करा. हे यकृत निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे.

– लाल मांसाचे सेवन कमी करा, यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver Disease Causes Symptoms And Prevention | | liver disease causes symptoms and prevention News

 

हे देखील वाचा

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

 

Benefits Of Eating Coconut And Coconut Water | नारळाच्या पाण्याबद्दल बरेच ऐकले असेल, परंतु कधी नारळ चहा प्याला का?

Tags: Alcohol consumptionAlcohol Consumption And ObesityAlcohol HarmfulexerciseGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHepatitis InfectionHow To Keep Liver Healthylatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleliverliver diseaseLiver Disease Causes SymptomsLiver Disease Causes Symptoms And PreventionobesityOver Counter Drugs Or Alcohol OverdoseoverweightpreventionSymptoms Of Liver Diseasetodays health newsWeak immune systemWhat To Do To Keep Liver Healthyअल्कोहोलअल्कोहोल हानिकारकआजारआजाराची लक्षणेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजीवनशैलीटाइप -2 मधुमेहनिरोगी आहारमद्यपानयकृतयकृत निरोगी कसे ठेवावेयकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ?लठ्ठपणाव्यायामहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Health Care Tips | vegetables not to eat in diabetes
ताज्या घडामाेडी

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

by Nagesh Suryawanshi
August 6, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स...

Read more
Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever

Viral Fever | पावसाळ्यात आजारांपासून वाचण्सासाठी आहारात करा या वस्तुंचा समावेश, रहाल तंदुरुस्त

August 6, 2022
Protein Rich Flours | protein rich flour replacement for wheat atta gram chickpea soya sattu roasted bengal gram

Protein Rich Flours | गव्हाच्या पीठाऐवजी आहारात समावेश करा या 3 हेल्दी ऑपशनचा, शरीरात होणार नाही प्रोटीनची कमतरता

August 6, 2022
Benefits Of Black Jamun | jamun is effective from hemoglobin to blood pressure know its benefits in marathi

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

August 5, 2022
Muesli Health Benefits | health why muesli good for weight loss in marathi

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

August 5, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021