आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या कुठं प्रवास करत असताना किंवा फावल्या वेळात तरुणांना हेडफोन घालून गाणे ऐकणे, व्हिडीओ पाहणे, वेबसीरीज पहायला खूप आवडते. आणि तरुणांमध्ये तर हेडफोन घालण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. ही काहींना सवय असते. पण ही सवय अनेकदा महागात पडू शकते. कारण हेडफोन घालून गाणे ऐकणे किंवा व्हिडीओ पाहणे हे आपल्या शरीरासाठी धोक्याचे आहे.
१) खूप वेळ हेडफोन लावले तर कानावर जास्त आवाजाचा मारा पडतो. यामुळे आपल्याला बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते.
२) इतर कारणामुळे येणाऱ्या बहिरेपणावर इलाज होऊ शकतो. पण हेडफोनमधून जास्त आवाजात जर गाणे ऐकले आणि यामुळे बहिरेपणा आला तर यावर इलाज केला जाऊ शकत नाही.
३) कानात खूप वेळ हेडफोन घातले तर कानातील मळ बाहेर पडत नाही. त्या मळाची गिठोळी तयार होऊन आपल्याला ऐकायला कमी येते.
४) कानाला पुरेसा कोरडेपणा न मिळाल्याने कानात बुरशी निर्माण होते. आणि या बुरशीमुळे आपल्या कानात पू होण्याची शक्यता असते. हेडफोन लावून गाणे ऐकणे खूप धोक्याचे आहे.