आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते. कारण, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. एकसारख्या स्वभावाची माणसे सापडणे तसे दुर्मिळच आहे. काही माणसांना उगाचच ओरडण्याची, चिडण्याची सवय असते. तर काहीजण खुपच शांत अबोल असतात. काही माणसे उगाचच हसतात, स्वत:शीच बडबड करतात, कधीकधी एकटेच हातवारे करत बोलतात, अशाप्रकारच्या स्वभावामुळे या लोकांना विक्षिप्त म्हटले जाते. परंतु, असे विक्षिप्त लोक जास्त काळ जगतात, असे एडिनबर्ग विद्यापीठाच्या मुख्य संशोधक कॅथरीन गेल यांनी आपल्या संशोधनाबाबत माहिती देताना म्हटले आहे. (Health News)
संशोधका म्हणतात…
1. विक्षिप्त लोक अनेकदा स्वत:ची जास्त काळजी घेतात. त्यांच्यात आरोग्याच्या बाबतीत व अन्य बाबतीत प्रोटेक्टिव्हनेसपणा जास्त प्रमाणात आढळून येतो. कदाचित याच कारणामुळे अशा व्यक्ती अधिक काळ जगतात.
2. विक्षिप्त लोकांमध्ये जास्त जगण्याचे आणि मृत्यू उशीरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.
सगळ्याच प्रकारचे आजार, अगदी कॅन्सरसारख्या अजारांनाही हे लोक कमी प्रमाणात बळी पडतात.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे