आरोग्यनामा ऑनलाइन टीम – यंदा उन्हाळा खुप वाढल्यामुळे घरातून बाहेर पडणे ही अवघड झाले आहे. अशावेळी हैराण करणाऱ्या उकाड्यापासून शांतता देणारा एसी आपल्याला हवाहवासा वाटतो. पण हा एसी आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. हे तुम्हाला माहित आहे का ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…
एसी सुरु असताना आपल्याला काही वेळ खुप छान वाटते. अशा थंड वातावरणात लगेच शांत झोपही लागते. पण अनेकदा आपण झोपलेलो असतो, तेव्हा तापमान फार थंड असते. पण जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण स्वतःला मेन्टेन करु शकतो. परंतू, आपण झोपलेले असताना अनेकदा एसी आपल्या आरोग्याला हानिकारक असतो. या थंडाव्यामुळे डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त थंडाव्यामुळे सांधेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो.
जेव्हा एसी सुरु असताना सर्व दरवाजे व खिडक्या बंद असतात. त्यामुळे एसीची हवा बाहेर न जाता खोलीतच राहते. आणि तेथील वातावरण थंड होते. अशातच आपल्यापर्यंत ताजी हवा पोहचत नाही. त्यामुळे थकला जाणवतो. एसीचा डक्ट स्वच्छ नसेल तर तुम्हाला श्वासाशी निगडीत समस्या आणि लंग इन्फेक्शन होऊ शकते. एयर कंडिशनर हवेमधील ओलावा शोषून घेतो. इतकेच नाही तर आपली त्वचा आणि केसांचा ओलावा देखील शोषून घेतात. ज्यामुळे स्किन आणि केस कोरडे पडतात. यामुळे कमी वयात वाढत्या वयाची लक्षणे दिसून येतात.
ऑफीसमध्येही एसी असल्याने आपल्याला एसीची सवय लागलेली असते. त्यामुळे गरमी सहन होत नाही. थंड वातावरणात राहिल्याने त्वचा कोरडी पडते. त्यामुळे एसीमध्ये असताना त्वचेवर सतत मॉयश्चरायझर लावावे त्याचबरोबर जास्त पाणी प्या.