जनुकीय उपचारामुळे मिळू शकते ह्रदयविकारापासून मुक्तता

Heart

आरोग्यनामा ऑनलाईन टिम- आजकाल आपल्या जीवनाला खुप महत्व दिले जाते कारण कधी कोणाला काय होईल हे सांगता येत नाही. सध्या ह्रदय विकाराचे प्रमाण फार वाढले आहे. व्यक्तीला चालता बोलता ह्रदयाचा झटका येवून तो काही क्षणातच जगातून नाहीसा होतो. नव्या संधोधनामुळे सध्याच्या ह्रदयरुग्णांमधील हा धोका टाळण्याचा मार्ग दिसला आहे. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी पेशींचे पुनरुज्जीवन करु शकेल, अशी जनुकीय उपचार पद्धती शास्रज्ञांनी विकसित केली आहे.

लंडनमधील किंग्ज महाविद्यालयातील मायुरो जियाक्का संशोधकांनी सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर जिवंत राहते, त्यावेळी तिच्या ह्रद्यावर व्रणाच्या स्वरुपात कायस्वरुपी संरचनात्मक हानी पोहोचलेली असते. या हानीमुळे भविष्यात या व्यक्तीची ह्रदयक्रिया बंद पडण्याची जोखीम असते.

पुढे ते म्हणाले की, नवे संशोधन हे या क्षेत्राचा उत्साह वाढवणारे आहे. आत्तापर्यंत मूलपेशींच्या सहाय्याने ह्रदयाच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी झाले. आता प्रथमच आम्ही मोठ्या प्राण्यांमध्ये ह्रदयपेशींची वास्तविक दुरुस्ती झाल्याचे पाहत आहोत.

या विषयावरील अभ्यास हा ‘नेचर’ प्रसिद्ध झाला आहे. या प्रयोगात संशोधकांनी ह्रदयविकाराचा झटका आलेल्या डुकराच्या ह्रदयात ‘मायक्रो आरएनए-१९९  जनुक्रिय द्रव्य अंतर्भूत केले. यानंतर महिनाभर या डुकराचे ह्रदय पुन्हा पूर्ववत कार्यक्षम झाल्याचे दिसून आले.

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, ‘ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळा तयार झाल्याने मायोकार्डियल इन्फाक्र्शन ह्रदयविकाराचा धक्का हे ह्रदयाची क्रिया बंद पडण्याचे कारण असते. जगभरात २ कोटी ३० लाखांहून जास्त जणांना बाधा होते.