आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Lemon | कोरोना महामारी (Coronavirus) सुरू झाल्यापासून लोक इम्युनिटीच्या (Immunity) बाबतीत खुपच अलर्ट झाले आहेत. काहीजण घरगुती काढे आणि इतर उपायांनी आपली इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे त्रासदायक सुद्धा ठरू शकते. अनेकजण व्हिटॅमिन सी (Vitamin C) साठी लिंबूपाणी (Lemon Water) किंवा काढ्यामध्ये लिंबू रस टाकून त्याचे सेवन करतात, परंतु लिंबूचे जास्त सेवन नुकसानकारक ठरू शकते. लिंबूच्या अतिसेवनाचे तोटे जाणून घेवूयात. (Lemon)
1. दात खराब होऊ शकतात (Teeth can be damaged)
रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांचा इनॅमल खराब होतो. दात किडण्यास सुरूवात होऊ शकते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या अॅसिडमुळे ही समस्या उद्भवू शकते.
2. पोटाचा त्रास (Stomach Problems) –
लिंबूपाणी जास्त प्रमाणात आणि नियमितपणे घेतल्यास पोटाला हानी पोहोचू शकते. लिंबूपाणी जास्त प्यायल्याने छातीत जळजळ आणि अल्सरचा धोका देखील वाढू शकतो.
3. हाडांचे होऊ शकते नुकसान (May cause bone damage) –
लिंबूपाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने हाडांवरही वाईट परिणाम होतो. संशोधनानुसार, लिंबाचा रस हाडांमध्ये असलेले तेल शोषून घेतो. यामुळे हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Lemon)
4. मायग्रेनच्या वेदना (Migraine pain)
आरोग्य तज्ञांच्या मते, लिंबूसारख्या आंबट फळांचे जास्त सेवन केल्याने देखील मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीला आधीच मायग्रेनची समस्या असेल तर त्याने लिंबूचे सेवन करताना काळजी घ्यावी.
5. डिहायड्रेशन (Dehydration) –
संशोधनानुसार, लिंबाच्या रसामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
त्यामुळे किडनीमध्ये लघवीचे उत्पादन वाढते. किडनी शरीरात साचलेले अतिरिक्त मीठ आणि द्रव बाहेर काढण्यास मदत करते.
पण लिंबू पाणी जास्त प्यायल्याने लघवीला वारंवार होते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
Web Title :- Lemon | excessive consumption of lemon can be harmful for your health know its disadvantages
Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत