डावखुऱ्या लोकांना असतो ‘या’ आजाराचा धोका ! संशोधकांचे मत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या तुलनेत डाव्या हाताने काम करणारे लोक स्किझोफ्रेनिया विकाराचे जास्त बळी ठरू शकतात. हा एक प्रकारचा मनोविकार आणि डिप्रेशनचा प्रकार आहे. स्किझोफ्रेनियाने बाधित ४० टक्के लोक डावखुरे, असतात, असा निष्कर्ष येल विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील १० टक्के लोकसंख्या डाव्या हाताने काम करणारी आहे.

हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात की, सायकोसिस असणारे वास्तवापासून दूर राहतात. त्यांचे अंधविश्वास त्यांच्यावर ताबा मिळवतात. ते बुद्धिभ्रंश झालेल्या स्थितीत राहतात. या संशोधकांनी १०७ लोकांवर संशोधन केले. कमी कमाई असलेल्या शहरी लोकांवर हे संशोधन करण्यात आले. यामध्ये असे आढळले की, डाव्या हाताने कामे करणारे सायकोसिसचे जास्त रुग्ण असतात. हे संशोधन करताना या लोकांना कोणत्या हाताने लिहिता? असा एकच प्रश्न विचारण्यात आला होता. कारण यावरून बरेच काही स्पष्ट होते.  यानंतर साधारण विश्लेषण केले गेले. एका नियतकालिकात हे संशोधन मांडण्यात आले आहे.