आरोग्यनामा ऑनलाईन- अनेक लोकं साखरेला पर्याय म्हणून गूळ किवा मधाचं सेवन करत असतात. मध(Honey ) आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतो. भूक वाढवण्यापासून तर पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधाचे(Honey ) आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. आज आपण मध खाण्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
मध खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) मधाच्या सेवनामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2) अनेकांना भूक न लागण्याची समस्या असते. अशांनी जर मधाचं सेवन केलं तर भूक वाढण्यास मदत होते.
3) मधामुळं पचनशक्ती वाढते.
4) खरूज किंवा अन्य त्वचेसंबंधित तक्रारी असतील तर एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं.
5) डोळ्यांशी निगडी काही तक्रारी असतील तर गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचं सेवन करावं.
6) मधामुळं उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
7) मधामुळं रक्त शुद्ध होतं.
8) हिवाळ्यात अनेकदा सर्दी, खोकला, पडसं अशा तक्रारी उद्भवल्याचं दिसून येतं. या तक्रारींवर कोमट पाण्यात 2 चमचे मध घालून ते पाणी प्यावं. यामुळं बराच फरक पडतो.
9) पोटदुखी किंवा मळमळ अशा समस्या येत असतील तर आल्याच्या रसात किंवा लिंबाच्या रसात मध मिसळून त्याचं सेवन केलं तर पोटदुखी कमी होते.
10) केसांच्या वाढीसाठीही मधाचा खूप फायदा होतो.
11) मधामुळं त्वचा तजेलदार रहाते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.