आरोग्यनामा ऑनलाईन- फाटलेल्या ओठांची समस्या हिवाळ्यामध्ये अधिक दिसून येते. जर ओठांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर ते कोरडे होऊ लागतात. मुली यासाठी महाग क्रीम किंवा लिप बाम वापरतात; परंतु त्याचा काही फरक दिसून येत नाही. आपण घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी दिसू लागतील. अभिनेत्री सोनम कपूर देखील आपले ओठ गुलाबी आणि मऊ ठेवण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब करते. जाणून घेऊ….
१) मध आणि साखर
सोनम कपूरने सांगितले आहे की ती आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ओठ एक्सफोलिएट करण्यासाठी होममेड स्क्रब वापरते. जे तिच्या ओठांची मृत त्वचा काढून टाकते. यासाठी सोनम मध आणि साखरपासून बनविलेले स्क्रब वापरते. हे स्क्रब तयार करण्यासाठी, थोडे मध आणि साखर चांगले मिसळा. आता १ मिनिटांसाठी आपल्या ओठांवर स्क्रब करा. स्क्रबिंगनंतर ओठ पाण्याने धुवा.
मध आणि साखर स्क्रबचा फायदा
मध ओठांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. याशिवाय साखरेद्वारे ओठांचा काळेपणा दूर होतो. ज्यामुळे ओठ गुलाबी बनतात.
२) खोबरेल तेल
ओठांवर स्क्रब केल्यावर नारळ तेलाने मालिश करा. यामुळे ओठांमधून कोरडेपणा दूर होतो आणि ओठ मऊ होतात. रात्री झोपायच्या आधी ओठांवर नारळ तेल लावल्याने फाटलेल्या ओठांपासून आराम मिळतो, असे सोनम म्हणते.
नारळ तेलाचे फायदे
१) फाटलेल्या ओठातून रक्त येत असल्यास तीन किंवा चार वेळा नारळ तेलाने मालिश करा.
२) नारळ तेलात कोरफड तेल मिसळून ओठांवर देखील लावू शकता. हे ओठांच्या टॅनिंग आणि पिग्मेंटेशनच्या समस्येपासून आराम देईल.
३) गुलाबाच्या फुलांच्या रसात नारळ तेल मिसळून लावल्यास गुलाबी ओठ होतात.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.