आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केळी असे एक फळ आहे जे कोणत्याही ऋतूत मिळतो. अशा या गुणकारी केळीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दिवसभर काही न खाता केवळ केळी जरी खाल्ली तर आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
केळी खाण्याचे फायदे
– केळी खाल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाष्ट्यात केळी खाल्ल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. केळी खाल्याने पचनक्रियाही सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास केळी उपयुक्त ठरते.
– जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर अशा वेळी फक्त केळी जरी खाल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. प्रवासादरम्यान केळी खाल्याने कफचा त्रासही दूर होतो.
– केळीत असणाऱ्या ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप फायदेमंद आहे.
– दररोज केळी खाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
– दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते.
– दारू पिल्याने चढलेली नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेक लाभदायक असतो.
– दररोज २ केळी आणि मध खाल्याने हृदयाचे आजार कमी होतात.
– नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास केळी, साखर आणि दूध यांचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
– गर्भवती महिलांनी केळी जरूर खाल्ली पाहिजे.
– केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबरमूळे वृद्धांना होणारे आजार कमी करण्यासाठी केळी उपयुक्त मानले जाते.
– केळी खाल्याने मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायदेमंद होतात.
– केळीच्या सालीची पेस्ट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.