आरोग्यनामा ऑनलाईन- आपल्याला माहितच आहे की, साखरेच्या तुलनेत गूळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतो. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, अशा अनेक पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो. गुळाचे आपल्या आरोग्यास कोणते फायदे होतात याच्याद्दल आज माहिती घेणार आहोत.
गूळ खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) गुळ-शेंगदाणे खाल्ल्यानं हिमोग्लोबीन लवकर वाढतं. ज्यांच्यात एचबीची कमी आहे त्यांनी याचं सेवन नक्की करावं.
2) थंडीच्या दिवसात गूळ खाणं फायदेशीर आहे. मात्र त्याचं सेवन हे प्रमाणात असावं. कारण गूळ उष्ण आहे.
3) शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जास्त असल्यास गूळ आवर्जून खावा.
4) शरीरात धातुंची झीज झाली असेल तर ती भरून काढण्याचं महत्त्वाचं काम गूळ करतो.
5) मासिक पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
6) मासिक पाळी दरम्यान तीळ आणि गुळ म्हणजे तिळगुळ खाल्ल्यानं पोट दुखणं कमी होतं.
7) जर घसा खवखवत असेल गुळाचा खडा खावा. यामुळं आराम मिळतो.
8) जेवणानंतर जर गुळाचा खडा खाल्ला तर पचनशक्ती सुधारते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.