भूक लागत नाही, ‘हा’ सुद्धा आहे एक आजार, वेळीच करा ‘हे’ उपाय

भूक लागत नाही, ‘हा’ सुद्धा आहे एक आजार, वेळीच करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भूक न लागणे, हा सुद्धा एक आजाराच आहे. परंतु, यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही. यावर तुम्ही घरगुती उपाय करून सहज मात करू शकता. शिवाय, या उपायांमुळे तुम्हाला चांगली भूक लागू शकते. हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे याविषयी आपण माहिती घेवूयात.

करा हे उपाय

१. हिंगाष्टक चूर्ण गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूपासोबत खाल्ल्यास चांगली भूक लागते. शिवाय अन्न पचनही होते.

२. सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळीसारखे भूक वाढवणाऱ्या पदार्थांचे चूर्ण करुन मधाबरोबर चाटल्यास भरपूर भूक लागते.

३. जेवणात चटणी आवश्य खा. लसूण, पूदिना, भोपळ्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, आले तीळाची चटणी खावू शकता. यामुळे पचन चांगले होते. पोटातले जंत मरतात.

४. जेवणात साजूक तूप आणि जेवणानंतर ताक घ्या. यामुळे भूक नक्की वाढते.

५. गरम पोळीला तूप लावून त्यावर लसूण किंवा पुदिन्याची चटणी खा.

६. बैठे काम करत असाल तर नियमित व्यायाम करा. किमान रोज १२ सूर्यनमस्कार घालावेत. भरपूर चाला.

७. रात्री उशिरा जेवणाच्या ऐवजी सांयकाळी लवकर जेवा.

८. टी. व्ही. पाहात किंवा मोबाईल पाहात जेवण करू नका.

९. जेवताना मन प्रसन्न ठेवा. यामुळे भूक जागी होते.

१०. जेवण झाल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करुन अर्धा किंवा एक चमचा खा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु