फक्त सनस्क्रीन त्वचेसाठी पुरेशी नाही, ‘या’ टिप्सही अवश्य फॉलो करा

फक्त सनस्क्रीन त्वचेसाठी पुरेशी नाही, ‘या’ टिप्सही अवश्य फॉलो करा

आरोग्यनामा ऑनलाइन – सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी केवळ सनस्क्रीन पुरेशी नसून त्यासाठी इतरही काळजी महिलांनी नियमित घेणे गरजेचे आहे. पूर्ण झोप, योग्य आहार, व्यायाम, हे निरोगी तन-मनासाठी आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर त्वचेसंदर्भात काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती घेवूयात.

अशी घ्या त्वचेची काळजी

अ‍ॅण्टी-एजिंग नाइट सीरम व व्हिटामिन सी, पेप्टाइड्स, हायलोनोनिक अ‍ॅसिड, रेटिनोल, ग्लायकोलिक अ‍ॅसिड, लॅक्टिक अ‍ॅसिडयुक्त क्रिम वापरा.

ओठांसाठी लिपबाम दिवसातून तीन, चार वेळा वापरा. लिपस्टिक व लिप ग्लॉसचा वापर करा. ओठ शुष्क राहू देऊ नका.

जर त्वचेवर केस, मस असतील तर त्वचारोग तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करा.

साबणाचा जास्त वापर करू नका. हे त्वचेला शुष्क आणि डिहायड्रेट बनवून देते. जर त्वचा शुष्क असेल तर स्क्रब करू नका.

धूम्रपान केल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. त्वचेला सुरकुत्या येतात. रेषा दिसतात. त्वचेचा तजेलदारपणा कमी होत जातो.

डोळ्यांखाली आइस्क्रीम लावा. आइस्क्रीम डोळ्यांच्या जवळपासची त्वचा हायड्रेट ठेवते. काळे वर्तुळ कमी करते.

हात-पायांवर मॉश्चरायजर व सनब्लॉकचा नियमित वापर करा.

वाढत्या वयाबरोबर त्वचा कोरडी होते. हातास मुलायम ठेवण्यासाठी हॅण्ड क्रिमचा नियमित वापर करा. झोपण्यापूर्वी फूट क्रीम पायांवर लावा. मोजे घाला.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु