जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – लहान मुलं ही सर्वांना हवी वाटतात. आणि घरात जर लहान मुलं पहिल्यांदा येत असेल सर्वांच्याच आनंदाला उधाण येत. पण आता नोकरी करणारे आई-वडील असतील तर त्यांना मुलं सांभाळणं शक्य नसत. त्यामुळं अनेक जण एकच मूल होण्याला प्राधान्य देतात. परंतु आता सध्या काही लोकांना जुळी मूळ हवीत आहेत. याच सर्वात मोठं कारण म्हणजे दोन वेळा प्रसूतीला सामोरे जाणे स्रियांना नको वाटते. म्हणून आता अनेक लोक जुळी मुलं होण्यासाठी उत्सुक आहेत.

सध्या अनेक स्रिया या नोकरी करतात. नोकरीला लागल्यानंतर त्यांचा काही वेळ तिथे सेट होण्यासाठी जातो. त्यामुळे त्या गर्भधारणा वेळेवर करू शकत नाहीत. आणि नंतर एकदा वय वाढलं कि, गर्भधारणा होण्यास खूप समस्या निर्माण होतात. त्यामुळं अनेक लोक कृत्रिम गर्भधारणेने मुलं जन्माला घालतात. त्यामुळे आता जुळी आणि तिळी मुलं जन्माला यायला लागली आहेत.

दरम्यान आयुर्विज्ञान संस्था आणि इतर सस्थांनी मुंबईतील काही दाम्पत्यांवर केलेल्या संशोधनातून असे समजले आहे कि, गरोदर असलेल्या ४५ टक्के महिलांनी जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिला आहे. आणि एवढच नाही तर अशा अनेक दाम्पत्यांना जुळी मुलं हवी आहेत. कारण महिलांना पुन्हा पुन्हा होणारा त्रास नको आहे. त्यामुळे अनेक दाम्पत्य जुळी मुल होण्याला प्राधान्य देत आहेत.परंतु यामुळे काही कुटुंबात खूप मोठे नुकसान होणार आहे. कारण दोन मुलांना एकाच वेळी सांभाळणं जमत नाही. आईला दोघांची भूक भागवता आली नाही. तर त्या दोन्ही मुलांचे आरोग्य सुधारत नाही. या ट्रेंडच अनेक जण स्वागत करतात. पण दोन मुलं सांभाळणं जमणार असेल तरच दोन मूळ होण्याला प्रधान्य द्यावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु