‘ओपन पोअर्स’च्या समस्येवर ‘हे’ उपाय करा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- आपण आपल्या चेहऱ्याची काळजी खूप जास्त प्रमाणात करत असतो वाढत्या वयानुसार सुरूवातीच्या टप्प्यावर ओपन पोअर्स जाणवल्यास या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. ओपन पोअर्स कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही वापरू शकता.
१) केळी :
त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवणयसाठी, चेहर्यावर पुन्हा तजेला येण्यासाठी केळं फायदेशीर ठरते. ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी काकडीमध्ये लिंबू पिळा. या मिश्रणाचा रस चेहर्यावर लावा. याने ओपन पोअर्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.
२) गुलाबपाणी आणि मध :
चमचाभर गुलाब पाण्यामध्ये मध टाकून त्यांचे मिश्रण बनवा. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा चेहरा मुलायम आणि तजेलदार तर बनतोच शिवाय ओपन पोअर्स ही कमी होतात.
३) ओट्स :
दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवा. ही पेस्ट १० मिनिटं चेहर्यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे ओपन पोअर्ससोबतच चेहर्यावरील डागही कमी होण्यास मदत होते.