‘भेंडी’ खूप गुणकारी औषध, ‘असा’ करा वापर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भेंडी ही भाजी अनेक आजारांवर गुणकारी आहे. भेंडीचे वानस्पतीक नाव ‘एबेल्मोस्कस एस्कुलेंट्स’ आहे. आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. भेंडीमध्ये खनिजांसोबतच विटामिन ए, बी, सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह आणि जस्त असते. भेंडीमध्ये जास्त प्रमाणात फायबरसुध्दा असते. मधुमेह असल्यास भेंडीची अर्ध शिजलेली भाजी खावी. ताजी हिरवी भेंडी मधुमेहाच्या  रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.

हे उपाय करा

* भेंडीच्या बीयांचे चूर्ण (५ ग्रॅम), विलायची (५ ग्रॅम), दालचीनी चूर्ण (३ ग्रॅम) आणि काळी मिरी (५ दाणे) हे एकत्र बारीक करून घ्यावे. हे मिश्रण दिवसातून ३ वेळा कोमट पाण्यातून घ्यावे. यामुळे मधुमेह निमयंत्रणात राहतो.

* काही भागांमध्ये भेंडीच्या कापलेल्या देठांना पीण्याच्या पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी अनुशापोटी हे पाणी पितात. उरलेल्या भेंडीच्या देठांना फेकून दिले जाते. मधुमेह नियंत्रण आणण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

* भेंडीच्या बीयांना एकत्रित करून घ्यावे. त्यानतंर त्यांना उन्हात वाळवावे. वाळल्यानंतर त्यांना बारीक वाटून घ्यावे. या बीयांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि उत्तम शरिरासाठी हे उपयुक्त असते. या चुर्णाला लहान मुलांना खाऊ घातल्याने ते एका टॉनिकप्रमाणे काम करते.

* वंध्यत्व दूर करण्यासाठी पुरूषांना कच्ची भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. शारिरिक कमतरता दूर करण्यासाठी भेंडी चांगला उपाय असल्याचे आदिवासी मानतात.

* भेंडी मध्यभागी कापून, लिंबूचा रस अर्धा चमचा, डाळींब आणि भूई आवळ्याची पाने (५-५ ग्रॅम) रात्रभर १ ग्लास पाण्यात ठेवा.  त्यानंतर सकाळी या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिश्रण बनवून दररोज दोन वेळा असे सात दिवस घ्यावे. या उपचाराने कावीळ एका आठवड्यात बरी होते. ताप आणि सर्दी-खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे.

* ५० ग्रॅम भेंडीला बारीक कापून २०० मिली पाण्यात उकळून घ्यावे. जेव्हा हे पाणी केवळ अर्धे होते, तेव्हा सिफलिसच्या रुग्णाला द्यावे. एका महिन्यापर्यंत हा उपचार करावा.