आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन वाढण्याच्या समस्येला कंटाळून अनेक लोक उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्च करतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी डायटकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही अशा भाज्या आहेत त्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. त्यापैकीच एक म्हणजे भेंडीची भाजी. भेंडीची भाजी आरोग्यदायी तेवढीच वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
भेंडीच्या सेवनाचे फायदे –
वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी देखील भेंडीचे मदतगार ठरते.
एक ग्लास भेंडीच्या पाण्यात ६ ग्रॅम कार्बोहाईड्रेट्स, ८० मायक्रोग्रॅम फोलेट, ३ ग्रॅम फायबर आणि २ ग्रॅम प्रोटीन असते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भेंडीचे पाण्याचे सेवन करा.
भेंडी खाल्ल्यामुळे पचनतंत्र चांगले राहाते. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते.