आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सामान्यपणे लहान बाळामध्ये बीपी लो असतो व वाढत्या वयाबरोबर वाढत जाऊन बाराव्या वर्षी तो स्थिरावतो. मोठ्या माणसांमध्ये हाय बीपी खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. तेवढ्या जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळत नाही. परंतु, लहान मुलांमध्येही हाय बीपी असू शकतो. लहान मुलांमध्ये हाय बीपी असण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळेही लहान मुला-मुलींना हाय बीपीचा धोका वाढतो.
जन्माच्या वेळी किंवा गर्भावस्थेत असतांना, जर मुलांना व्हिटॅमिन डी मिळाले नाही, तर मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. गर्भावस्थेत किंवा लहानपणी जर योग्य प्रमाणात व्हीटामिन डी नाही मिळाले, तर वयाच्या ६ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हाय ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो.
उपाय –
पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करू शकतो. त्यामुळे ज्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आहेत, अशा भाज्यांचा जेवणात समावेश करा. केळी पोटॅशियमचा सर्वात चांगला स्त्रोत आहे.स्ट्रॉबेरीमधील पोटॅशियम उच्च रक्तदाबाला नियंत्रित करत असतं.
रातळामध्ये कॅरोटीन, कॅल्शियमसारखे फायबर्स असतात. जे बीपी नियंत्रणात आणतात.
उच्च रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी दिवसातून ३ किवींचं सेवन करावं.
तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांची नियमित रक्तदाब चाचणी केली पाहिजे. यामुळे त्यांना हाय बीपीपासून वाचवता येऊ शकतं.