आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सतत जागरण करणे, कायम रात्रपाळीमध्ये काम करणे, आदी कारणांमुळे झोपेवर परिणाम होतो. शांत आणि पूर्ण झोप न मिळाल्याने त्याचे शरीरावर अनेक घातक परिणाम दिसून येतात. कमी झोपेमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यासाठी शरीराला झोप मिळणे खुप महत्वाचे असते. नियमित पाच तासांपेक्षा कमी झोप घेत असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते.
हे आहेत दुष्परिणाम
1 लैंगिक समस्या
टस्टोस्टेरॉन हार्मोन्समुळे महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध स्थापित करण्याची इच्छा होते. व्यवस्थित झोप घेतल्याने टेस्टोस्टेरॉनची लेव्हल वाढते. म्हणूनच कमी झोप झाल्याने लैंगिक समस्या वाढतात.
2 त्वचा विकार
झोप पूर्ण झाली नाही तर त्वचेसंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. कमी झोपेमुळे त्वचेसंबंधी निर्माण झालेली समस्या लवकर बरी होत नाही.
3 मधुमेह
रात्री 5 तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्याने पुरुषांमध्ये हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, जाडेपणा, कमी शारीरिक हालचाली ही सामान्य बाब आहे.
4 लठ्ठपणा
झोप पूर्ण न झाल्याने हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे व्यक्तीला काही कॅलरी फूड खाण्याची इच्छा होते आणि त्यामुळे वजन वाढते.