आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जपानमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना हाय हिल्स बंधनकारक आहेत. तर जपानी महिलांनी यास कडाडून विरोध केला आहे. आपल्याकडे महिला आवडीने हाय हिल्स सँडल घालतात. तिकडे जपानमध्ये वेगळीच परिस्थिती आहे. हाल हिल्स बंधनकारक असल्याने जपानी महिलांनी सरकारकडे याचिका केली. जपानच्या आरोग्य व श्रममंत्र्यांनी कंपन्यांच्या नियमांचे समर्थन महिलांच्या मागणीकडे पाठ फिरवली आहे.
जापनीज भाषेतील कुतसू म्हणजे शूझ आणि कुतस्यू म्हणजे वेदना होय. या २ शब्दांवरून जपानी महिलांनी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे जपानमधील ३२ वर्षांची अभिनेत्री, युमी इशिविका यांनी ही मोहीम सुरू केली. त्यांच्या या मोहिमेला हजारो जपानी महिलांनी पाठिंबा दर्शविली आहे. या मोहिमे अंतर्गत हाय हिल्स बंधनकारक करण्याविरोधात ऑनलाईन स्वाक्षरी घेण्यात आल्या. कामाच्या ठिकाणी महिलांना हाय हिल्स बंधनकारक करू नये, अशी मागणी करणारी या याचिका या स्वाक्षऱ्यांसह सरकारला पाठवली आहे. हाय हिल्समुळे लैंगिक दुजाभाव होतो आहे.
याशिवाय महिलांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. पायाला सूज, जखम होते आणि पाठीच्या खालच्या भागावर ताण येतो. हाय हिल घालून चालणे शक्य होत नाही. धावता येत नाही. तसेच धावल्यास पायाला दुखापत होते. फक्त शिष्टाचार म्हणून हे बंधनकारक केले आहे, अशी खंत जपानी महिलांनी याचिकेत मांडली आहे. मात्र, जपान सरकारने महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. उलट सरकारने हाय हिल्स बंधनकारक ठेवणाऱ्या कंपन्यांचे समर्थन केले आहे. जपानचे आरोग्य आणि श्रममंत्री तकुमी नेमोटो यांनी या मोहिमेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कार्यालयांचे नियम योग्य आहेत. कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचा ड्रेसकोड गरजेचा आणि योग्य आहे.