आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फिटनेससाठी कोकम ज्यूस पिणे अतिशय चागले ठरू शकते. हा ज्यूस घरी तयार करण्यासाठी 400 ग्रॅम कोकम आणि 4 लिटर पाणी आवश्यक आहे. हे दोन्ही एकत्र उकळून घ्यावे. नंतर हे पाणी गाळून घेऊन रोज हा ज्यूस सकाळी आणि सायंकाळी सेवन करावा. रातांब्यापासून तयार केलेल्या कोकम ज्यूसचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या टाळण्यासाठी कोकमचे तेल लावावे.
2 पोट खराब झाल्यास कोकम चूर्ण एक ग्लास थंड पाण्यात मिसळून प्यावे.
3 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. गार्निकॉल, कॅन्सरच्या पेशी कमी करते.
4 हृदय निरोगी आणि ब्लड प्रेशरही सामान्य राहते.
5 इंजाइम्सची क्रियाशिलता कमी करते.