• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

थंडीमध्ये तोंडावर वाफ घेण्याचे अनेक फायदे, जाणून घेतल्यास त्वचेसह आरोग्याच्या तक्रारी नक्की विसराल

by Sajada
January 1, 2021
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य, सौंदर्य
0
steaming

steaming

174
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- सध्या जगभरात कोरोनाची महामारी आहे. आजारपणाची सतत भीती सगळ्यांनाच वाटत असते. ११ महिन्यानंतर सुध्दा कोरोना पूर्णपणे थांबलेला नाही. शरीरावर वातावरणातील बदलाचा परिणाम होत असतो. कोरोना काळात तब्येत चांगली राहावी तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सगळेच वेगवेगळे उपाय करत आहेत. पोषक आहार, काढा, पिवळे हळदीचे दूध, गरम कपडे, वाफ घेणे(steaming ) हे उपाय सर्वच करतात.

थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी तसेच घशाच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ घेतात. काहीजण त्वचेची काळजी घेण्यासाठी मसाज करण्याआधी वाफ घेतात. तर जाणून घेऊ शरीराला वाफ घेतल्याने(steaming ) होणारे फायदे …

वाफ घेण्याची पद्धत

– तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात तीन ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा.

– हे पाच दहा मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक काॅटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकण काढून पाच ते दहा मिनिटे वाफ घ्या.

– वाफ घेताना तोंडाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या.

– आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पद्धत रिपीट करा .

वाफेचे फायदे

थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी-खोकला हे आजार होत नाही. हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा मऊ होते. चेहऱ्यावर चकाकी येते. चेहऱ्यावरआलेले डेट सेल्स नाहीसे होतात. चेहर्‍यावरील त्वचा मोकळी होते. रोज किंवा आठवड्यातून दोन-तीन दिवस चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. परिणामी, त्वचेची घाण दूर होते पिंपल्स प्रॉब्लेम नियंत्रणात येतात.

वाफ घेतल्यानं धूळ प्रदूषणावर चेहर्‍यावर चिकटलेली घाण स्वच्छ होते. चेहऱ्याला ग्लो येतो. नियमित गरम वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. नाक चोंदले असल्यास वाफ घेतल्याने नाक मोकळे होते. श्वासोच्छ्वास सुरळीत सुरु राहतो. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते. वाफ घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. चेहऱ्याचे सर्व डाग जातात. चेहरा खूप स्वच्छ दिसतो. थंडीत अनेक जणांची त्वचा कोरडी होते, अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. चेहर्‍यावर चकाकी वाढते.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: coldhealthsteamingआरोग्यथंडीवाफ
metabolism
Food

‘या’ 5 पदार्थांमुळे मेटाबॉलिज्म होते स्लो अन् वाढतो लठ्ठपणा, जाणून घ्या कोणते पदार्थ

October 3, 2020
milk
Food

आपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे ? जाणून घ्या

November 2, 2020
Jaggery
Food

Jaggery Pack Benefits : जर तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुमांपासून मुक्त व्हायचं असेल तर लावा गुळाचा पॅक

November 23, 2020
‘उभे राहून पाणी पिणे’ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक
माझं आराेग्य

पाणी कमी प्यायल्याने वाढू शकते गोड खाण्याची सवय, जाणून घ्या ३ कारणे

November 8, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

15 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.