आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मिनरल मेकअप म्हणजे सगळ्यात सुरक्षित मेकअप, यामध्ये कोणत्याच प्रकारच्या केमिकलचा वापर होत नाही. आजकाल मेकअप करण्यासाठी तरुणी खूप जागरुक असतात कारण एक खराब मेकअप आपल्या त्वचेला पुर्णपणे नुकसान पोहवू शकतो. अशामध्ये कोणता मेकअप स्किनसाठी बेस्ट आहे हे ठरविणे कठीण होऊन जाते. खासकरुन ऑयली स्किन असणाऱ्या मुलींना मेकअपपासून लांब राहणे योग्य वाटते कारण मेकअप केल्याने त्यांना पिंम्पल्स येण्याची भीती असते पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्यासाठी मिनिरल मेकअप सगळ्यात बेस्ट आहे.
खनिज पदार्थांसारखे जसे की, झिंक ऑक्साइट आणि लोह तत्व यांनी बनलेले उत्पादक जसे पावडर, क्रिम, फाऊंडेशन आणि आयशॅडो आदींना मिनिरल मेकअप म्हणले जाते. मेकअप एक्सपर्ट आणि सेलिब्रिटी ही मिनिरल मेकअपला त्वचासाठी योग्य मानतात. जर सेंसेटिव्ह स्किन आणि ज्यांना स्किनची समस्या आहे त्यांच्यासाठी मिनरल मेकअप योग्य आहे. हा मेकअप तुमच्या त्वचेवर खूप काळ टिकून राहतो. चला तर मग जाणून घेऊया मिनिरल मेकअपचे फायदे…
काय आहे मिनरल मेकअप ?
जुन्या काळात राणी- महाराणी जमीनीतून निघणाऱ्या महाग आणि विशेष दगडांचे पावडर आणि अन्य खनिज पदार्थ जिंक ऑक्साइड, टाइटेनियम ऑक्साइड आणि माइका सारख्या छोट्या कणांपासून बनलेले उत्पादक सौंदर्यासाठी वापरत असे. ज्याला मिनिरल मेकअप म्हणले जाते. इतरांपेक्षा हा मेअकप खूप हलका असतो आणि तो दैनंदिन जीवनासाठी पण योग्य आहे. हे आपल्या चेहऱ्याला आकर्षक बनवितो.
मिनरल मेकअपचे फायदे
मिनिरल मेकअपमध्ये उपस्थित तत्व बॅक्टेरिया मुक्त असतात. यामुळे त्वचेवर कोणत्याच प्रकारची अॅलर्जीची समस्या होत नाही. हा मेकअप तुमच्या चेहऱ्यावर अनेक तास टिकतो.
मिनरल फाउंडेशनमध्ये व्हीटॅमिन ए असते. हे आपल्या त्वचेची रक्षा करण्यासाठी मदत करते आणि यामुळे त्वचेची आग होत नाही. हे सेंसेटिव्ह मेकअपसाठी फायदेशीर असतात. मिनरल मेकअप प्रोडक्टचा वापर केल्याने त्वचेची रोमछिद्रे बंद होत नाही यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंम्पल्स येण्याची शक्यता नसते.