आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जीभेचा रंग व अन्य स्थिती पाहून तुम्ही आरोग्याविषयी खुप महत्वाची माहिती जाणून घेवू शकता. यामुळे भविष्यातील आरोग्य समस्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यादृष्टीने उपायसुद्धा करता येऊ शकतात. जिभेच्या बदलत्या रंगावरून कोणता आजार झाला आहे, हे समजू शकते. यामुळे आजाराचा प्राथमिक अंदाज लावला जाऊ शकतो.
असा ओळखा आजार
1 जास्त चिकट होणे
शरीरात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे जीभ चिकट-गुळगुळीत होते. धुम्रपानाच्या सवयीमुळे जीभ चिकट व गुळगुळीत होण्याची समस्या असते.
2 तोंड येणे
जास्त तिखट खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अल्सरमुळे ही समस्या होते.
3 पांढर्या रंगाच्या चकत्या
चीजप्रमाणे पांढर्या रंगाच्या जिभेवर चकत्या तयार होणे हे लक्षण आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कमकुवत रोगप्रतिकार क्षमता, औषधे यामुळे असे होते. गंभीर आजार उद्भवण्याचा हा इशारा आहे.
4 पिवळ्या रंगाचा थर
याचा अर्थ तोंडाची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अधिक गरम पदार्थांचे सेवन, किंवा जिवाणूंमुळे जिभेवर दाट पिवळ्या रंगाचा थर येतो. ताप-सर्दी-खोकला, श्वसनाचे आजार होतात.
5 लाल होणे
जिभ लाल होणे हे अॅनिमिया आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. शरीरात व्हिटॅमिन इ12 च्या कमतरतेमुळे असे होण्याची शक्यता असते.
Visit : arogyanama.com