आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही लोकांसाठी स्मार्टफोन हे व्यसन झाले आहे. फोनच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मोबाईल हँडसेट हा पर्यावरण आणि आरोग्यासाठी घातक आहे. मोबाईल फोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या रसायनामुळे आणि धातूंमुळे माती, पाणी आणि हवेमध्ये विषारी पदार्थ मिसळतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
हे आहेत दुष्परिणाम
1 फोनच्या व्यसनामुळे तणावही वाढू शकतो. महिलांमध्ये तणावांचे हेच प्रमुख कारण आहे.
2 रात्री झोपण्यापूर्वी फोनचा वापर केल्याने झोप खराब होऊ शकते.
3 फोनचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.
4 फोनमधून निघणारे रेडिएशन शरीरावर नकारात्मक प्रभाव करतात.
5 मोबाईल फोनच्या अधिक वापराने रक्तदाबही वाढतो.
6 हृदयरोगाने ग्रस्त होऊ शकता.
7 ऐकण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पडतो.