आरोग्यनामा ऑनलाइन टीम : प्रकृती अत्सावस्थ झाल्यानंतर अनेक रूग्णांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात येते. ही सिस्टिम नक्की कोणते काम करते ? याचा काही उपयोग होतो का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. शरीर प्रसन्नचित ठेवण्यासाठी कार्यान्वीत असलेले अवयव आणि त्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टिमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. परंतु अवयव निकामी होतात, ते कार्य करणे बंद करतात तेव्हा अडचणीत वाढ होते.अवयवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टिमची मदत घेतली जाते. ही सिस्टिम रुग्णाला जिवंत ठेवण्यासोबतच त्याला लवकर बरे करण्यासाठी उपयोगी ठरते. मात्र, प्रत्येक वेळी यश येईलच असे नाही, काही रुग्णांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवल्यानंतरही त्यांचे शरीर साथ देत नाही.
शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी झाल्यानंतर रुग्णाला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फुप्फुसे, निमोनिया, ड्रग ओव्हरडोस, ब्लड क्लॉट, सीओपीडी, सिस्टिक फाइब्रोसिस या सिस्टिमवर ठेवण्यात येते. हृदय अचानक बंद पडल्यानंतर, ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर लाइफ सपोर्टवर ठेवण्यात येते. रुग्णाची प्रकृती खालवण्याचे कारण शोधल्यानंतर डॉक्टर त्यास लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्याचा निर्णय घेतात. रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेऊन त्याला आधी ऑक्सिजन दिला जातो. नंतर एक ट्यूब नाक किंवा तोंडात टाकून ती इलेक्ट्रिक पंपाला जोडतात. रुग्णाला आराम मिळावा म्हणून त्याला झोपेचे औषधही दिले जाते. बंद पडलेले हृदय पुन्हा कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी सीपीआर दिला जातो. रक्त आणि ऑक्सिजन रुग्णाच्या संपूर्ण शरीरात सोडला जातो. यासाठी त्याला इलेक्ट्रिक शॉकही दिला जातो.यासोबत आवश्यक औषधीही दिली जाते.
डायलिसिस देखील एक प्रकारच्या लाइफ सपोर्ट सिस्टिमचाच एक भाग आहे. किडनी ८०-९० टक्के निकामी झालेल्या रुग्णावर डायलिसिस केले जाते. शरीरातील खराब झालेले रक्त तसेच पदार्थ फिल्टर करून बाहेर काढले जाते. एका नळीच्या मदतीने रुग्णाच्या शरीरात पाणी आणि पोषक तत्वे दिले जातात. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्यास, अवयव सुरळीत काम करत असलेल्या रुग्णाचे लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात येते. तसेच रुग्णाच्या प्रकतीत कुठलीही सुधारणा दिसत नसल्यास, शरीर उपचाराला साथ देत नसल्यास डॉक्टर्स त्याच्या नातेवाइकांच्या परवानगीने सपोर्ट सिस्टिम काढतात. परंतु, रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपचार सुरु ठेवले जातात.