आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दोन विरूद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होता. दुसरा एक प्रकार म्हणजे काही महिला महिलांकडे आकर्षित होतात आणि काही पुरूषही पुरूषांकडे आकर्षित होतात. त्यांना होमोसेक्शुअल, गे किंवा लेस्बियन म्हटले जाते. आणि स्वत:च स्वत:कडे आकर्षित होणे म्हणजे ऑटोसेक्शुअल होय. ऑटोसेक्शुअल लोक स्वत:च्या शरीराला पाहून स्वत:ची लैंगिक गरज भागवू शकतात. ते स्वत:चे शरीर बघूनच आकर्षित होतात. हे लोक गे अथवा लेस्बियन नसतात. त्यांच्यासाठी ऑटोसेक्शुअल हा शब्द वापरला जातो. त्यांना कोणत्याही जेंडरच्या व्यक्तीकडे पाहून लैंगिक आकर्षण वाटत नाही.
ऑटोसेक्शुअल हा शब्द शोधताना वैज्ञानिकांना फार मेहनत घ्यावी लागली. या शब्दाचे विश्लेषण करण्यासाठी अजूनही याबाबत पूर्ण माहिती नाही. तसेच संशोधनही मोठ्याप्रमाणात झालेले नाही. जे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या ऑटोसेक्शुअॅलिटीने आकर्षित होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी १९८९ मध्ये पहिल्यांदा या शब्दाचा उल्लेख डॉक्टर बर्नाड एपेलबाउम यांनी केला होता. पण आता हा शब्द स्वताच्या शरीराकडे बघून सेक्शुअली आकर्षित होणारांसाठी वापरला जातो.
तज्ज्ञ सांगतात की, स्वत:ला बघून आकर्षित होणे फार सामान्य बाब आहे. पण काही लोकांना दुसऱ्यांच्या तुलनेत स्वत:ला बघून किंवा स्पर्श करून अधिक उत्तेजना जाणवते. अशाच लोकांना ऑटोसेक्शुअल म्हटले जाते. अन्य काही तज्ज्ञाच्या मते दुसऱ्या लोकांप्रमाणेच ऑटोसेक्शुअल लोकांमध्येही सेक्शुअॅलिटीचे वेगवेगळे असतात. काही लोक ऑटोसेक्शुअल असण्यासोबतच ऑटोरोमँटिकही असतात. हे लोक स्वत:सोबतच डेटला जातात किंवा चांगल्या वातावरणात एक वॉक घेऊन येतात.