आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वाढत्या महागाईमुळे आज कोणताही पदार्थ पूर्णपणे शुद्ध मिळणे कठीण झाले आहे. फळे, धान्य आणि अगदी दुधामध्येही मोठ्याप्रमाणावर भेसळ केली जाते. शरीराला दुधापासून पोषण मिळते. परंतु आज त्याच दुधाने अनेक जण पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. याला कारण आहे दुधात होणारी अपायकारक भेसळ. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यात हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. त्यामळे दुधाची गुणवत्ता तर खालावतेच. सोबत आजार पसरतात.
भारतीय अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर अली आहे. देशभरात विकल्या जाणाऱ्या दुधामध्ये १०% दूध हे शरीरासाठी अपायकारक आहे. तर त्या १०% पैकी ४०% दूध हे पिशवीच्या माध्यमातून पोहोचवले जाते. अशा भेसळयुक्त दुधामुळे आतड्यांचे विकार, किडनीचे विकार अशा समस्या निर्माण होत आहे.
भेसळयुक्त दूध कसे ओळखावे :
१. दुधात भेसळ असल्यास दूध शिळे असले तरी रंग बदलत नाही.
२. दुधात जर युरियाची भेसळ केली असेल तर ते गडद पिवळ्या रंगाचे दिसते.
३. सर्वात महत्वाचे म्हणजे भेसळ नसलेल शुद्ध दूध हे चिकट नसते . तळहातावर दूध घेऊन दुधाचा चिकटपणा तपासता येऊ शकेल.