आरोग्यनामा ऑनलाईन टीम : बर्याच लोकांच्या पाठीवर मुरुम आणि डाग पडतात. तर कधीकधी लहान लहान फोडी येऊन त्याचे काळ्या डागात रुपांतर होते. त्याकडे आपण अधिक लक्ष देत नाही. याचे नेमके कारण काय यावरही आपण विचार करत नाही. या डागांचे मुख्य कारण म्हणजे आपले मळलेले कपडे असतात. आपण घातलेल्या कपड्यांमध्ये घामाने येणारा ओलेपणा आणि त्यानंतर त्यावर जमणारी धूळ या तकारणांमुळे या समस्य़ा होतात. आपल्याला या समस्या असतील तर त्यावर काही उपाय आहेत. त्यामुळे हे डाग दूर होऊ शकतात. ते जाणून घेऊ
१. टी ट्री ऑईल : म्हणजे चहाच्या झाडाचे तेल
चहाच्या झाडाच्या तेलामध्ये एंटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता असते. हे तेल मुरुम रोखण्यास मदत करते. चहाच्या झाडाचे तेल थेट मुरुमांवर आणि डागांवर लावावे. ते लावण्यापूर्वी समान मात्रेत पाणी घेऊन तेल थोडे पातळ करून घ्यावे, मग ते डागांवर लावावे.
२. घाम आल्यावर आंघोळ करा
जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा काही घाम येण्यासारखी काम केली तर त्यानंतर लगेच आंघोळ केली पाहिजे. कारण घामामध्ये भिजवलेले कपडे तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतात, त्यामुळे मुरुम किंवा त्याने डाग होण्याची शक्यता वाढते. ते जमले नाही तर आपण गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने आपली पाठण चांगली चोळून घ्यावी. ज्याने घामाने छिद्र खुले झालेले असतात. त्याने मृत त्वचा म्हणजे डेड स्कीन निघून जाते. तसंच महिलांनी टी शर्ट किंवा ब्रा चा वापर करावा, ज्यामुळे घाम शक्यतो कमी येतो.
३. बेंझॉयल पेरोक्साइड क्रीम लावा
आपल्या त्वचेतून धूळ, बॅक्टेरिया आणि जास्त तेल काढून टाकण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा बेंझॉयल पेरोक्साइड क्रीम किंवा सॅलिसिक अॅसिड क्लीन्सर लावावे. बेंझॉयल पेरोक्साईड एक एंटीसेप्टिक म्हणून काम करते. त्यामुळे ते आलेल्या फोडी, मुरुम आणि डाग सुकवून काढून टाकते. मात्र ते लावल्यानंतर कपडे घालण्यापूर्वी ते पूर्ण सुकलेले असेल याची काळजी घ्या नाहीतर क्रीम कपड्याला लागली तर त्याचा काही फायदा होणार नाही.