आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी सुगंधासाठी अत्तर वापरले जायचे आता त्याची जागा परफ्युमने घेतली आहे. परफ्युम्स न आवडणाऱ्या व्यक्ती कमीच असतील. वेगवेगळे परफ्युम्स ट्राय करायला अनेकांना आवडते. मात्र योग्य परफ्युमची खरेदी आणि वापर कसा करावा याविषयी अनेकांना माहिती नसते. जाणून घ्या परफ्युमची क्वालिटी कशी ओळखायची आणि वापर कसा करायचा याबद्दल माहिती –
कुठे स्प्रे केला पाहिजे –
शरीराच्या ज्या अवयवांवर अधिक घाम येतो त्यावर परफ्युम स्प्रे केला पाहिजे. उदा. मानेच्या खाली , कानाच्या मागे , अंडर आर्म्सवर .
अधिक काळ सुगंध टिकवून ठेवण्यासाठी –
शरीराच्या ज्या भागावर परफ्युम स्प्रे करणार आहात त्यावर आंघोळ केल्यानंतर आधी सुगंधी मॉश्चराइजर लावा किंवा पेट्रोलियम जेली वापरा त्यामुळे सुगंध अधिक काळ टिकेल.
कोणता परफ्युम निवडावा – स्वस्त की महाग
स्वस्त परफ्युम अधिक काळ टिकत नाही. त्यामध्ये एसेंशियल ऑइल आणि सिंथेटिक फ्रेगरेंसचा वापर केला जातो. तर ब्रँडींग आणि पॅकेजिंगमुळे महागडे परफ्युम अधिकच महाग बनतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी परफ्युम बद्दल माहिती अवश्य जाणून घ्या.
कोणता परफ्युम किती वेळ टिकतो
याविषयी माहिती परफ्युमच्या आवरणावर माहिती दिलेली असते.
परफ्युम – ६ ते ८ तास
ऑ डे परफ्युम – ५ तास
ऑ डे कलोन- २ तास
बॉडी मिस्ट- एक तासापेक्षा कमी
जर परफ्युम रंग बदलत असेल तर
परफ्युम बनवताना जर नैसर्गिक घटक वापरले गेले असतील तर तो परफ्यूम नक्कीच रंग बदलणार. जर तुमचा परफ्युम काही दिवसानंतर अधिक गडद झाला असेल तर तो उच्च दर्जाचा परफ्युम आहे असे समजावे.