आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रोज आपली कामासाठी खूप धावपळ होते, अंगाला घाम येतो. त्यामुळे अंगाला वास येणे सहाजिकच आहे. या घामाच्या वासापासून वाचण्यासाठी आपण डीओ, परफ्युम यांची खरेदी करतो. पण ते खरेदी करण्यापूर्वी आपल्याला परफ्य़ुमबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. परफ्युमची क्वालीटी कशी तपासायची , परफ्युम कसा वापरायचा याबाबत आपल्याला माहित नसते. जाणून घ्या परफ्युमविषयी महत्वाच्या गोष्टी :
१) आपण परफ्युम हातात आला की सरळ कोठेही मारत सुटतो. पण हे परफ्युम साधारणतः शरीराच्या ज्या भागावर जास्त घाम येतो त्या जागेवर स्प्रे करणे आवश्यक आहे. जसे गळ्याच्या खाली, कानांच्या मागे, छातीवर, घुडघ्यांच्या मागे, तर कोपऱ्यांच्या आत हा परफ्युम मारला पाहिजे. तरच आपल्या घामाचा वास येणार नाही. कारण इतर अंगावर सहसा जास्त घाम येत नाही.
२) परफ्युम मारल्यांनंतर तो जास्त काळ टिकत नाही. परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकून राहण्यासाठी अंघोळ झाल्यानंतर बिना वासाचे मॉस्टराइजर लावा किंवा स्प्रे करण्यापूर्वी पहिल्यांदा पेट्रोलियम जेली लावल्यावरही परफ्युम वास अधिक काळ राहतो.
३) परफ्युमच्या नावावरून हेही समजू शकते की कोणता परफ्यूम शरीरावर किती काळ टिकेल. जसं परफ्युमच्या बॉटलवर परफ्यूम लिहीले असेल तर ६-८ तास त्याचा सुगंध राहतो. ऑ डे टॉयलेट लिहिलेले असेल तो २-३ तास दरवळतो. ऑ डे कलोन असल्यास २ तास आणि बॉडी मिस्ट असेल तर तो परफ्युम १ तासापेक्षा कमी चालू शकतो.
४) महागडा परफ्युम घेतला तर तो भारीच असतो असे नाही किंवा तो अधिक वेळ टिकणारा असतो असेही नाही. महागड्या परफ्युममध्ये फक्ट टॉपचे नोट्स असतात. परफ्युमचा बेस आणि मिडिल नोट्स यात नसतात. हे परफ्युम साधारणतः मिळणाऱ्या इसेंशल ऑइल आणि सिंथेटिक फ्रेगरेंसने बनतात.
५) जर तुमचा परफ्युम रंग बदलत असेल तर तो खराब झाला असं समजू नका. परफ्युमचा रंग बदलने स्वाभाविक आहे. कारण परफ्युमचा रंग बदलला तर ते उच्च दर्जाच्या इंग्रीडिएंट्सने बनवलेला असतो.