आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, फायबर यांसारखे घटक असतात. लिंबू पाणी आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान करते. मात्र लिंबू पाणी पिणे सर्वांसाठीच फायदेशीर नाही. जाणून घ्या काही कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन टाळावे –
1) ज्यांना दातांविषयी समस्या आहे. त्यांनी चुकूही लिंबूपाण्याचे सेवन करू नये कारण यामुळे त्यांच्या दातांमधील संवेदनशीलताची समस्या आणखी वाढू शकते.
2) अल्सरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी लिंबाचे पाणी पिऊ नये. यामुळे पोटामध्ये जळजळ वाढून पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
3) जर तुम्हाला यूरिन संबंधित कोणतीही समस्या असेल लिंबू पाण्याचे सेवन करू नये यामुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकते.
4) ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असते. त्यांनीही लिंबाचे सेवन करू नये. कारण लिंबामध्ये अॅसिडचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
5) यूरिक अॅसिडमुळे ग्रस्त असलेल्या लोकांनी देखील लिंबाचे सेवन करू नये कारण यामुळे शरीरात सूज आणि वेदना वाढू शकते.