नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

new-born-baby

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : लहान बाळांबाबत आपल्याला फार माहिती नसते. केवळ त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत आपण जास्तीत जास्त माहिती घेत असतो. बाळाची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. परंतु, नवजात बाळांच्या बाबतीत काही रंजक गोष्टी असतात, ज्या बहुतांश लोकांना माहित नसतात. टिव्हीवरील जाहीरातींमधून जी माहिती मिळते तेवढीच जास्तीची माहिती आपल्याला असते. नवजात बाळांमध्ये अशा कोणत्या रंजक गोष्टी असतात, ज्या अनेकांना माहित नसतात, त्या आपण जाणून घेणार आहोत.

नवजात बाळाच्या या आहेत रंजक गोष्टी

१ चव ओळखण्यासाठी जेवढ्या ज्ञानपेशी आपल्या जीभेवर असतात त्याच्या तीनपट बाळाच्या जीभेवर असतात.

२ गर्भवती स्त्रीचा एखादा अवयव निकामी अथवा दुखापतग्रस्त झाला तर तो दुरूस्त करण्यासाठी तर गर्भातील बाळ आपल्या शरीरातून स्टेमसेल आईच्या शरीरात पाठवते.

३ मेंदू हा लहान बाळांच्या शरीरातील ५० टक्के ग्लुकोजचा वापर करत असतो.

४ बाळांच्या डोळ्यांचा आकार हा त्यांच्या पूर्ण विकसित डोळ्यांच्या ७५ टक्के एवढा असतो.

५ नवजात बाळाच्या पायांच्या गुडघ्यांना वाटी नसते.

६ नवजात बाळ रडत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत.

७ जन्माच्यावेळी बाळाच्या शरीरात २७० हाडे असतात.

८ नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाचे प्रमाण मिनिटाला ४० एवढे असते.

९ नवजात बाळाला लांबचे स्पष्ट दिसत नाही.

१० लहान बाळ श्वास घेणे आणि गिळणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी करू शकते.

११ लहान बाळाला वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत मिठाची चव कळत नाही.

१२ नवजात बाळाला केवळ काळा आणि पांढरा रंग दिसतो. म्हणजेच त्यांची दृष्टी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असते.

१३ पहिल्या वर्षी बाळाची वाढ ज्या वेगाने होते तेवढ्या प्रमाणात वाढ होत राहिली तर २० व्या वर्षी त्याची उंची ३० फूट होऊ शकते.

१४ लहान मुले डोळे उघडे ठेवून झोपू शकतात.

१५ जन्मानंतरच नव्हे तर गर्भातही बाळ आईच्या आधी जेवत असते. म्हणून गर्भवतीची जेवणाची काळजी घेतली जाते.