आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टेस्टोस्टेरॉन एक एक स्टेरॉयड हार्मोन असून पुरुषांच्या अंडकोशातून स्रावीत होते. महिलांमध्येही टेस्टोस्टेरॉन आढळून येते. परंतु, पुरुषांच्या तुलनेत याचे प्रमाण खूप कमी असते. हे हार्मोन पुरुषांची सेक्शुअल क्षमता विकसित करते. टेस्टोस्टेरॉन रेड ब्लड सेल्सचा स्तरही नियंत्रणात ठेवते. सेक्शुअल कार्यप्रणालीसुद्धा मेंटेन करते. पुरुषांमध्ये आढळून येणारा सेक्स हार्मोन कमी होण्यामागे विविध कारणे असून त्याविषयी माहिती घेवूयात.
ही आहेत कारणे
१) वयाच्या ३० व्या वर्षानंतर शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होऊ लागतो.
२) इन्फेक्शन किंवा एखाद्या जखमेमुळे, डायबिटीज, लिव्हर फंक्शन आणि किडनी समस्येमुळेसुद्धा शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी होऊ शकतो.
३) रेडिएशन किंवा केमोथेरपी घेतली असेल, गुप्तांगमध्ये एखादी समस्या, शरीरात आयर्नची मात्रा जास्त, पियुष ग्रंथी संबंधित समस्या, तणाव जास्त असेल तर टेस्टोस्टेरॉन कमी होते.
४) जास्त प्रमाणात अल्कोहलचे सेवन, लठ्ठपणा किंवा इतर औषधींचे सेवन केल्यानेही शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होऊ शकतो.
५) अनेकवेळा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही असे होते.
हे आहेत परिणाम
* टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी झाल्यामुळे आरोग्य आणि सेक्स लाइफ दोन्ही गोष्टीवर नकारात्मक प्रभाव पडतो.
* लिंगामध्ये उत्तेजना कमी, डिप्रेशन, थकवा वाढणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात.
* शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर जेवढा कमी होईल व्यक्तीची एकाग्र क्षमताही तेवढी कमी होऊ लागेल.
* हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते. झोप न येणे आणि वजन वाढण्याची शक्यता राहते.
तपासणी, उपचार
शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तर मोजण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते. जर शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी असेल तर शरीरात याची लक्षणे दिसून येतात. परंतु चिंतेचे काही कारण नाही, लाइफस्टाइलमध्ये बदल करून आणि हेल्दी डाएट घेऊन नैसर्गिकरीत्या टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढवता येतो.