आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जगभरात मलेरिया दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे मलेरियाबद्दल लोकांना जागरूक करणे. लहान मुलांचा विचार केला तर त्यांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एका संशोधनानुसार, दरवर्षी सुमारे २२ टक्के मुले या आजाराचे बळी पडतात. मुलामध्ये मलेरियाची लक्षणे आणि ते टाळण्याचे मार्ग जाणून घ्या.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात.
१) झोप, थकवा आणि चिडचिड
२) मुलाला मळमळ आणि अतिसार
३) तीव्र ताप होण्याची शक्यता
४) उलट्या
५) भूक न लागणे
६) पोटदुखीची समस्या
७) झोप न लागणे
८) अशक्तपणा
संरक्षण कसे करावे जाणून घ्या.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
१) घराच्या साफसफाईची काळजी घ्या-
घाण व पाणी जमा झाल्यास डास जमा होण्यास सुरुवात होते. अशा वेळी घर व्यवस्थित स्वच्छ करा. तसेच कुठेही पाणी साचू देऊ नका.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
२) बाळाला थंड ठिकाणी ठेवा-
आपल्या बाळाला खूप गरम ठिकाणी ठेवू नका. नेहमीच थंड ठिकाणी किंवा एसी रूममध्ये ठेवा.
३) बाळाला फिकट रंगाचे कपडे घाला-
गडद कपड्यांकडे डास पटकन आकर्षित होतात. अशावेळी मुलाला हलक्या रंगाचे कपडे घाला.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
४) मच्छरदाणी-
आपण मुलाच्या पलंगावर मच्छरदाणी लावू शकता. यामुळे डासांपासून बचाव होईल आणि त्यांची योग्य झोप होईल.
५) संध्याकाळी बाळाला बाहेर काढू नका-
संध्याकाळी आणि मोकळ्या हवेत मलेरियाचे डास जास्त चावतात. यामुळे मुलाला बाहेर आणि घराच्या छतावर घेऊन जाऊ नका.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
६) सिट्रोनेला तेल या क्रीम लावा-
आपल्या मुलाच्या शरीरावर सिट्रोनेला, कडुनिंब, लैव्हेंडर तेल किंवा क्रीम लावा.
७) डास मारणारे औषध-
आपण घराच्या बाहेर आणि आत एक क्वाइल, कार्ड किंवा लिक्विड इलेक्ट्रिक किंवा औषध लावू शकता. बाळाला घराबाहेर काढण्यापूर्वी स्प्रे किंवा क्रीम लावा.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
८) मुलाच्या आहाराची काळजी घ्या –
मुलाला संतुलित आहार द्या. तसेच भरपूर पाणी प्या. जेणेकरून पाण्याची कमतरता जाणवणार नाही.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या