आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आपणास समजली आणि त्यावर वेळीच उपचार केल्यास जीवदान मिळू शकते. हार्ट अटॅक आल्यावर छातीत जोरात वेदना होतात, खोकला येतो आणि व्यक्ती जमिनीवर पडतो. परंतु, प्रत्येक व्यक्तीमध्ये अशीच लक्षणे असतील असे नाही. हार्ट अटॅक नेहमी काहीतरी संकेत देऊनच येतो. यासाठी वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. डायबिटीस, हायपरटेंशन आणि लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
हार्ट अटॅक येतो तेव्हा छातीत वेदना होतात. असे असले तरी अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवाय ही अचानक येतो. यास सायलेन्ट हार्ट अटॅक म्हणतात. परंतु, तो येण्यापूर्वी काही संकेत मिळतात. ते समजून घेतल्यास वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास संकट टाळता येऊ शकते. छातीत ब्लॉकेज असल्यास छातीत दबाव झाल्यासारखे वाटते. तसेच छातीत वेदना आणि प्रेशरही जाणवू शकते. अशी काही लक्षणे दिसल्या ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. छातीत कळ येणे आणि खांदा-हाताकडे वेदना हळूहळू वाढत जाणे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. अनेकदा छातीत काही वेदना न होता खांदे किंवा हातांमध्ये वेदना होतात.
अचानक चक्कर आल्यास अथवा कमजोरी मुळे नीट उभे राहता येत नसल्यास ताबडतोब आजूबाजूच्या लोकांना कल्पना द्या. तसेच डॉक्टरांना बोलवण्यास सांगा. छातीच्या मधोमध वेदना होत असेल आणि हा त्रास हळूहळू जबड्याकडे सरकल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण असते. तसेच हार्ट योग्यप्रकारे ब्लड पंप करू शकत नसल्यास पायांवर सूज येते. हार्ट फेलिअरच्या आधी किडनी कमजोर होऊ लागते. त्यामुळे पायांवर सूज येते. अशी लक्षणे आढल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले पाहिजेत.