आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वल्र्ड बिकिनी चॅम्पियन २९ वर्षीय क्रिस्टिना सिल्वाने तिच्या फिटनेसचे रहस्य काही दिवसांपूर्वी जाहिरपणे सांगितले होते. यात तिने फिटनेस तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. मस्कुलर बॉडीमुळे खूपच हेल्दी फिल होत असल्याचेही तिने म्हटले आहे. क्रिस्टिनाने मस्कुलर बॉडी कशी बनवली त्याचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत.
हे आहे तिच्या मस्कुलर बॉडीचे रहस्य
१) वेळ मिळताच ती स्केटिंग करते. पार्क, गार्डनमध्ये जाऊन मोकळा श्वास घेते. यामुळे तिला ताजेतवाणे वाटते.
२) मुलींनी जिममध्ये जाण्यास घाबरू नये, असे ती म्हणते.
३) काही ना काही उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे अंग दुखते आणि तेथूनच फिटनेसची सुरुवात होते.
४) डायट बॉडी टाईपप्रमाणे घ्यावा. ती कोणत्याही प्रकारचा डायट फॉलो करत नाही.
५) फिटनेसमुळे लाइफस्टाइलला बॅलेंसिंग येते.
६) तुमच्या लाइफस्टाइलमध्ये आपोआप फिट होईल असा आहार घ्या.
७) फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते.
८) तिला सोशलाईज होणे पसंत नाही कारण यामुळे फिटनेस रुटीन बिघडते, असे तिचे म्हणणे आहे.
९) ती म्हणते, खाण्याच्या वस्तूकडे मी फारसे पाहत नाही कारण त्यामुळे खायचे मन होईल आणि भूकही लागेल व वाढेल.
१०) ती स्वत:ला बेस्ट बनविण्यासाठी वर्कआउट करते.
११) आधी शरीरात फॅट तयार करावे, मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे, असेही ती सांगते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)