आरोग्यानामा ऑनलाइन टीम : काही चुकीच्या सवयींमुळे पाठदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. परंतु, महिलांमध्ये पाठदुखीची समस्या जास्त दिसून येते. केवळ आपल्याच देशात नव्हे तर प्रगत देशांमध्ये सुद्धा पाठदुखीची समस्या मोठ्याप्रमाणात आढळते. ब्रिटनमध्ये सुमारे २ कोटी ३० लाख लोक गंभीर पाठदुखीने त्रस्त आहेत. ब्रिटिश पेन सोसायटीने याबाबतचे संशोधन केले आहे.
हे लक्षात ठेवा.
* पाठदुखीने त्रस्त असलेले लोक सतत पेनकिलर्स घेत राहतात. यामुळे तात्पुरता आराम मिळतो. परंतु, समस्या मुळापासून दूर होत नाही.
* पाठदुखत असेल तर व्हिटॅमिन डी कमी असण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्याव्यात.
* ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश कमी येथील लोकांना डी व्हिटॅमिन मिळत नाही. म्हणून ही समस्या जास्त दिसून येते.
* आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश असूनही डी जीवनसत्वाची कमतरता आढळते. योग्य आहार आणि व्यायामाचा अभाव ही या मागील कारणे आहेत.
Visit : arogyanama.com