आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुम्हाला रात्री झोप येत नसेल, रात्री तुम्ही जागत असाल. या मध्ये मेडिकल कारणही असण्याची संभावना असते. तसेच आज काल मोबाईल चा वापर हे एक मोठे कारण आहे झोप न येण्या मागे. तर दुसरा कारण तुम्हची तब्यत ठीक नसणे. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसालं तर तुम्हला अनेक समस्यांना तोंड द्यावा लागेल. चला जाणून घेऊ झोप न येण्याचे कारणे
– जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्हाला रात्री झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. मायग्रेनमुळे जास्त प्रमाणात डोके दुखल्यानेही रात्री झोप येत नाही.
– मॅग्नेशियममूळे तणाव कमी करण्यात, चिंता दूर करण्यात, मूड चांगला ठेवण्यात आणि रात्री झोप येण्यात खूप मदत होते. जर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमी असेल तर तुम्हांला या गोष्टीचा त्रास जाणवतो. यामुळे रात्री झोप येण्यातही समस्या निर्माण होते.
– अस्थमाच्या त्रासामुळेही रात्रीच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. याच सोबत सीओपीडीसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे ही झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
– डिप्रेशननी ग्रस्त रुग्णांना देखील झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. रात्रभर झोप न येण्यासोबतच वजन वाढणे किंवा कमी होणे, वागणूक मध्ये बदलावं, आत्महत्या करण्याची इच्छा होणे अशी लक्षणे दिसू लागतात. यावेळी वेळीच थेरेपिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.