आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस निरोगी असल्यास तुम्ही कोणतीही हेअरस्टाइल करू शकता. मात्र, केसांच्या विविध समस्या असतील तर ते शक्य नाही. केस हे नेहमी चकमदार, काळेभोर आणि घनदाट असावेत. केसांची योग्य काळजी न घेतल्यास त्यांचे आरोग्य बिघडते. अनेकांचे तारुण्यातच केस पांढरे होतात. पांढरे केस हे वार्धक्याचा लक्षण असल्याने असे तरूण वृद्धासारखे दिसतात. अनेकदा निरोगी व्यक्तींचे केस सुद्धा पांढरे होतात. केस पांढरे का होतात, याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.
१. पोषकतत्त्वांची कमतरता
शरीरात विटॅमिन बी, आयर्न, कॉपर आणि आयोडिनची कमतरता असल्यास केसांना आवश्यक पोषकतत्त्वे मिळत नाही. यामुळे केस गळतात आणि पांढरे होतात.
२. तणावाची स्थिती
सतत ताणतणावात राहिल्याने केस तर पांढरे होतात. तणावात समतोल आहार घेतला जात नसल्याने आवश्यक पोषकतत्त्व शरीरास मिळत नाहीत. तणावात धुम्रपान, मद्यपान आदी व्यसनाचे प्रमाणही वाढते त्याचा प्रतिकुल परिणाम केसांवर व शरीरावर होतो.
हे उपाय करा
* फोलिक अॅसिड आणि व्यसनांपासून लांब राहावे.
* लाइफस्टाइलमध्येही योग्य बदल करा.
* डायटच्या साह्याने या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो.