‘या’ आजारांवर रामबाण उपाय आहे भोपळा, याकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहारात दुधी भोपळ्याचा समावेश करणे आणि त्याचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधी भोपळा आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचे निवारण करतो. मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी याचे सेवन करावे. भरपूर पाणी असल्याने हे फळ सहज पचते. पोटाशी संबंधित विविध आजार जसे अल्सर आणि अपचनाच्या तक्रारी दूर करण्यात भोपळा फायदेशीर आहे.
हे उपाय करा
* एक ग्लास भोपळ्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन केल्याने घामाच्या माध्यमातून सोडियम नष्ट होऊ शकणार नाही. शरीरात सोडियमची पातळी कमी असल्याने थकवा जाणवतो आणि खूप तहान लागते.
* सकाळी प्रथम भोपळ्याचा रस घेतल्याने अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.
* अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी भोपळ्याच्या रसात तिळाचे तेल मिसळून झोपण्यापूर्वी डोक्याची मालिश करावी.
* यामुळे मूत्रपिंडविषयक आजार बरे होतात. लघवी करताना जळजळ होत असल्यास जेवणात भोपळ्याचा समावेश करावा. तसेच भोपळ्याचा रस नियमितपणे घ्यावा.
* यकृताची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी भोपळा उपयोगी आहे.
Comments are closed.