आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मध हे एक औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. मधाचे शरीराला अनेक फायदे होतात. त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यासाठी मधाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने जाणून घेऊ मधाचे आणखीन काही फायदे
– रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मध हे उत्तम पदार्थ आहे. मधात असणाऱ्या ऍन्टीबायोटिक आणि ऍन्टीऑक्सिडंट गुणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात 2-3 चमचे मध मिसळून याचा सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते.
– मधामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात आणि हृदयासंबंधी अनेक आजार दूर करण्यात मदत होते. जर तुम्हाला वजन वाढीचा त्रास होत असेल तर त्यावर मध हे एक उत्तम उपाय आहे.
– खोकला झाल्यास मध आणि सोंट चाटल्याने खोकला लवकर कमी होण्यात फायदेमंद असतो.
– त्वचा जाळली असेल अशा ठिकाणचा डाग जाण्यासाठी रोज त्यावर मध चोळावे यामुळे डाग कमी होण्यात मदत होते.
– चेहऱ्याची रंगत वाढण्यासाठी रोज सकाळी मध आणि गुलाब जल मिसळून लावल्याने काही दिवसातच चेहरा गोरा होतो.
– टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो आणि मध एकत्रित करून मसाज केल्याने टॅनिंग दूर होते.